Sunday, January 10, 2010

नटरंग (मराठी चित्रपट)

रं

कामाचा व्याप वाढल्याने , अक्खा वीक ब्लॉग वर नवीन पोस्ट करण्यास जमले नाही.



बहुचर्चित असा झेंडा बघायचा प्लान ठरला होता , परतु राजकीय सेन्सॉरशिप मधे अडकल्याने आणि नटरंग
त्याऐवजी लागल्याने , नटरंग पाहण्याच्या योग आला.

आता नटरंग या कलाकृती विषयी मला झालेले आकलन या विषयी खरडत आहे.

मध्यंतरी "रीटा" या शांता गोखले (अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्या आई) यांनी लिहिलेल्या पुस्तकावर
आधारित "रीटा" हा रेणुका शहाणे दिग्दर्शित चित्रपट येऊन गेला.

त्याच प्रमाणे "नटरंग" हा डॉ. आनंद यादव यांनी लिहिलेल्या नटरंग या पुस्तकावर आधारित आहे.

ऐनवेळी थोडा फार तिकिटचा गोंधळ झाल्याने " वाजले की बारा " ही लावणी अर्धिच पाहायला मिळाली.

नटरंग बघून कसे वाटले याचे उत्तर जरा का मला एक वाक्यात द्या असे सांगितले तर मी ईतकेच म्हणू

शकेन की नटरंग च्या प्रत्येक लावणिचे रंग जेवढे उत्कृष्ट, लोभसवाणे आणि सुखावह होते,तितकाच


नटरंग चा खरा रंग अतिशय गडद आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे .

पिंजरा १९७२ ( दिग्दर्शक:. वी. शांताराम ) या गाजलेल्या तमाशाप्रधान चित्रपटानंतर, नटरंग हा त्याच पठडितला चांगला चित्रपट इतक्या वर्षांनी पाहायला मिळाला.
पिंजरा , मी बघितला नसल्याने दोघांची तुलना मी करणार नाही.
(आणि तो पहिला असता तरी तुलना करणे मला शक्य नाही )

कारण प्रत्येक कलाकृती ही तिच्या जागी उत्कृष्ट असते, असे मी मानतो. त्यामुळे तुलना करण्याच्या भानगडीत मी पडत नाही. (आणि माझा तेवढा रीच पण नाही)असो...

अतुल कुलकर्णी हा नटरंगचा एक्का आहे. भूमिकेसाठी त्याने घेतलेली मेहनत त्याच्या कामातून दिसून येते.
अप्रतिम असे काम त्याने केले आहे. हॅट्स ऑफ.

नाच्या च्या भूमिकेला योग्य तो न्याय त्याने दिला आहे. आणि त्या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने त्याची निवड केली , यासाठी दिग्दर्शक (रवींद्र जाधव)यांचे आभार.


पोटापाण्यासाठी निवडलेला "तमाशा" हा मार्ग आणि त्यात आलेले यश-अपयश,तमाश्यामधे काम
करणार्‍या कलाकारांच्या जीवनाचे वास्तववादी दर्शन यावर भाष्य करणारा असा हा चित्रपट आहे.


अतुल च्या जोडीला , किशोर कदम (सौमित्र,गारवा फेम) यांचे ही काम छान झाले आहे .

सोनाली " अप्सरा आली" या लावणीत खरच अप्सरा सारखी दिसली आहे.



या लावणीच्या काही ओळी (मोह आवरत नाही).

ओ ओ ओ
कोमल काया की मोह माया
पूनव चांदणे न्हाले

सोन्यात सजले, रुप्यात भिजले
रत्नप्रभा तनु न्हालि

ही नटली थट्ली, जशी उमटली
चांदणी रंगमहाली

मी यौवनबिजली, पाहून थीजली
इन्द्रसभा भोवताली

अप्सरा आली ........

या सर्वांच्या जोडीला गुरू ठाकूर याने लिहिलेल्या लावण्या आणि तरुण संगीतकार अजय-अतुल
यांनी दिलेले संगीत , त्यामुळे लावण्या एकदम अस्सल वाटत आहेत.

खूप दिवसांनी वेगळ्या विषयावरचा आणि डोक्याला खाद्य पुरवणारा चांगला चित्रपट पाहायला मिळाला.

राजेंद्र

1 comment:

  1. बरेच ऐकलेय या चित्रपटांबद्दल. आम्हाला कधी पाहायला मिळतील कोण जाणे. बाकी अतुलसाठी तर पाहायलाच हवा कसेही करून लवकर.:)
    परामर्ष छान.

    ReplyDelete