Sunday, May 30, 2010


डोळ्याखालची काळी वर्तुळे
मर मर कष्ट केल्याचा जसा पुरावा
रहाटगाड्यासाठी केलेली धडपड रोजचीच


घरून आलेला नवर्‍याचा फोन
नवर्‍याला सांगितलेला ठाव ठिकाणा
तो म्हणाला येतो आणायला
त्यामुळे मिळालेले आत्मिक  समाधान

त्यात आज नवरा खुशीत
गाडीत लावलेले सलील चे गाणे
वाटते हा प्रवास, असाच चालू रहावा

त्याने दिलेला मोगरा
क्षण भर का होईना
पूर्वीच्या दिवसाना उजाळा


पूर्वीचे दिवस आठवून
गालावर पडलेली खली
त्यावेळी सारखी पडायची खलि
जशी रोज होते मराठी घरात कुकरची शिटी


 अश्याच आठवणी ना उजाळा देत
मैलभर चा तो प्रवास संपतो
रखवालदार दरवाजा करर्रर्र्र करत उघडतो


निष्पाप अशी ती पोर
वाट पाहून दमुन झोपलेली असते.
माझे मन मात्र उद्याच्या
वेळापत्रकात गुंतलेले असते

Sunday, January 31, 2010

मराठी गाणी

1) जोगवा या चित्रपटातील ........




जीव दंगला, गुंगला, रंगला असा.... पिरमाची आस तू...
जीव लागला लाभला, ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू...…
पैल तीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझ तु...
सुख भरतीला आल, नभ धरतीला आल, पुनवचा चांद तु....


चांद सुगंधात येईल.. रात उसासा देईल.. सारे धरती तुझी रुजव्याची माती तू..खुळ्या आभाळ ढगाळ त्याला रुढीचा ईटाळ..माझ्या राख सजणा हि काकनांची तोड माळ तू....
खूळ काळीज हे माझ तुला दिल मी आताड..
तुझ्या पायावर माखील माझ्या जन्माचा गोंधळ...


जीव दंगला, गुंगला, रंगला असा.... पिरमाची आस तू...
जीव लागला लाभला, ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू...ऽऽऽऽ
पैल तीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझ तु...$$$
सुख भरतीला आल, नभ धरतीला आल, पुनवचा चांद तु....


2) सखे कसे सांग तुला


गीत :- संदीप खरे


गायक :- सलील कुलकर्णी
 
3)  गंधित वारे
 
गीत :- संदीप खरे

गायक :- सलील कुलकर्णी


4) नटरंग मधील ... अप्सरा आली























4) झेंडा मधील ....





5) नटरंग मधील.... खेळ मांडला












तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरंना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी ऊधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो ऊरी पेटला .... खेळ मांडला


सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार, पाठीशी तू ऱ्हा हुबा
ह्यो तुझ्याच ऊंबऱ्यात खेळ मांडला


उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भेगाळल्या भुईपरी जीनं; अंगार जीवाला जाळी
बळ देई झुंजायाला किरपेची ढाल दे
ईनवीती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा जळलं शीवार
तरी न्हाई धीर सांडला ... खेळ मांडला


गीत:- गुरु ठाकूर


संगीत:- अजय-अतुल


स्वर:- अजय गोगावले


चित्रपट:- नटरंग (२०१०)

6) अगं बाई ... अरेच्चा!


कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची उर्मी
लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते
प्रीयतम भेटाया तुज आले मी .... कळलं का ?


कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची उर्मी


मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया ... माझा राया ग
मर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया ... माझा राया ग


माझं काळीज तू; माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी
या संसाराला देवाजीची छाया ग


मेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया ... माझा राया ग


मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला
प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला
होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला
तू आलीस अन्‌ जगण्याला अर्थ नवा आला
प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला


मक्याच्या शेतात एकलीच होते ठावुक नव्हतं कुणा
अरे उभ्या पीकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा
मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा

तुझ्या प्रीतित झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी
माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का रे सख्या दूर तू
सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे


तुझ्या प्रीतित झालो खुळा, छंद नाही मला वेगळा
माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का ग सखे दूर तू
सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग

गीत:- श्रीरंग गोडबोले


संगीत:- अजय-अतुल


स्वर:- अजय, अमेय दाते, विजय प्रकाश,
          योगिता गोडबोले, बेला सुलाखे


चित्रपट:- अगं बाई ... अरेच्चा! (२००४)

7)  नटरंग ऊभा ललकारी नभा .....




धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट
नटनागर नट हिमनट परवत ऊभा
उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग
पख्वाज देत आवाज झनन झंकार
लेऊनी स्त्रीरूप भुलवी नटरंग


रसिक होऊ दे दंग चढु दे रंग असा खेळाला
साता जन्माची देवा पुन्याई लागु दे आज पनाला
हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग
नटरंग ऊभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग


कड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छ्ननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी
किर्पेचं दान द्यावं जी ... हे यावं जी किर्पेचं दान द्यावं जी


ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर ऊपकार
तुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार
मांडला नवा सौसार आता घरदार तुझा दरबार
चेतला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग
नटरंग ऊभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग


कड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छ्ननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी
किर्पेचं दान द्यावं जी ... हे यावं जी किर्पेचं दान द्यावं जी


गीत:- गुरु ठाकूर
संगीत:-अजय-अतुल
स्वर:-अजय गोगावले, अतुल गोगावले
चित्रपट:-नटरंग (२०१०)

Saturday, January 23, 2010

टॅगलो

1) Where is your cell phone?

   दिवस भर वापरल्याने ..... तो उगवणार्‍या दिवसा साठी चार्ज होत असतो.

   ठरलेल्या जागी.

2)  Your Hair ?
    केस आहेत काळे भोर ,,,, १-२ ठिकाणी बेमुदत

    संपावर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

3) Your Mother ?
    जास्त नाही ५९ होतील पूर्ण मे मधे, पण मनाने तरुण , उत्साही .

4) Your Father ?
    मित्र , मार्गदर्शक , माझ्यापुढील आदर्श.

5) your Fav. Food ?
    जे ताटात वाढले आहे ते सगळे संपवायचे, त्याशिवाय पानावरून उठायचे नाही.
    अशी लहानपणापासूनची शिकवण. जसे श्रीखंड अथवा कोंबडी मिटक्या मारत
    खाता, तसे कारल्या ची भाजी ,पालेभाज्या निमूटपणे खायच्या.
    सो खाण्याचे जास्त लाड नाहीत.

6) Your Dream Last Night ?
    सकाळी जशी वेळेवर ची ट्रेन गाठायची असते , तशी रात्रीची झोपायची गाडी मिळता मिळत
     नाही , आणि मिळाली की इतका मेल्यासारखा झोपतो की, स्वप्न सोडा, तो मोबाइल अलार्म सकाळी
     स्नूज़ होऊन दमतो. वीक एण्ड ला आहेच , म झोपेचा बॅकलॉग भरून काढणे.

7) Your favorite drink ?
    कैरी चे पन्हे , कोकम सरबत , आले घातलेला चहा , थोडी कडू कॉफी.

8) Your Dream/goal ??
    टू रूम किचन फ्लॅट आणि त्यात जवळची माणसे.

9) What room are you in ?
    एक्सटेंडेड हॉल मधे, गॅलरी तून येणार्या गार वार्‍याचा आनंद घेत हा तपशिल देत आहे.

10) Your Hobby ?
      छंद :- पुस्तक वाचणे , फिरणे,

11) Your Fear ?
    भीती कसली, ,,,, जे समोर येईल त्याला फेस करणे..

12) Where do you want to be in 6 years?
       स्वताच्या घरात
13) Where were you last night?


      घरीच होतो.
14) Something that you aren’t?


     
15) Muffins?

     हा काय प्रकार आहे .    

16) Wish list item?

     लेह लडाख . कान्हा , जिम कोर्बेट पाहायचे आहे
17) Where did you grow up?

      मुंबई .

18) Last thing you did?

      दात घासले . 

19) What are you wearing?

      व्हाईट टी शर्ट आणि डार्क ग्रीन हाफ पॅंट

20) Your TV?

      झी मराठी च्या प्राइम टाइम च्या मालिका , आमच्या मातोश्री व्रत
     घेतल्या सारख्या पाहत असतात.
      बाबांचे मधेच सी एन बी सी १८ वर जाणे येणे चालू असते.
      मी मधेच टी व्ही पहिला तर पहिला,नाहीतर पेपर वाचणे,

21 ) Your pets?

       परवानगी नाही .

22) Friends?

     या बाबतीत तोटा नाही.

     मैत्रिणी २-३ च .यात नेहमीच मन्दिचे वातावरण असते.

23) Your life?

      मस्त आहे.

24) Your mood?

      छान असतो मूड .

25) Missing someone?

      कॉलेज चे दिवस,

      मातोश्री बंगल्यावर चे दिवस ( कॉलेज ला असताना )
      बिल्डिंग मधल्या मित्रान बरोबरच्या पिकनिक .
      जास्त च मिस करायला मिस यायची आहे.

26) Vehicle?

     टी व्ही एस विक्टर......

     बजाज स्कूटर मिस करतोय.

27) Something you’re not wearing?

     अंगचटीला येणारा टी शर्ट……

28) Your favorite store?
      स्पेसिफिक..... काय घ्यायचे आहे त्यावरून ठरवणार.
      साधा सुधा टी शर्ट रस्त्यावर पण छान मिळतो , नीट पाहून घेतला की झाले
      त्यासाठी ब्रॅण्डेड दुकानच पाहिजे असे काही नाही.

29) Your favorite color?


      आकाशी निळा , राखाडी , फिका पिवळा , पांढरा

30) When was the last time you laughed?

      झाले २-३ तास ,

31) Last time you cried?

     सलील चे , दमलेल्या बाबांची कहाणी हे गाणे एकुन

     ढसा ढसा नाही पण , डोळ्यात पाणी उभे राहीले.

32) Your best friend?

     आहेत की ....... नाव घेत नाही आता.... लगेच डोक्यावर बसतात.

33) One place that you go to over and over?

      आमच्या इकडचा ज्युसवाला .....

34) One person who emails me regularly?

      मित्र वर्ग ,,,, बिल्डिंग मधला, कॉलेज चा

Sunday, January 17, 2010

इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी @ Prithvi Theater, Juhu.

इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी @ Prithvi Theater, Juhu.




ऑफीस मधून घरी आल्यावर मस्त पैकी चिल मारत असताना वर्तमानपत्रातील मनोरंजन या पानावरून नजर भिरभिरत होती. जवळपास्स कुठे चांगला सिनेमा , नाटक आहे का
याची शोधा शोध चालू होती. असे चालू असताना नजर एका नाटकाच्या जाहिरातीवर गेली
"नाटक कंपनी , पुणे" सादर करीत आहे


थेसपो १० आणि थेसपो ११ चे विजेते दीर्घांक








Thespo is an annual youth Theatre Festival.


"इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी "
पृथ्वी थियेटर, जानकी कुटीर जुहु.
चला कधी प्रायोगिक पाहायचा योग येत नाही , आणि त्यात पृथ्वी थियेटर पण कधी पहिले नाही. तर या वेळी बघूच, दोन्ही गोष्टी कश्या आहेत ते.


नाटक पाहायची आवड असल्याने वेस्टर्न लाइन वरची दिनानाथ, शिवाजी मंदिर,
प्रबोधनकार ठाकरे .. अशी सगळी नाट्यगृह पाहून झाली. पृथ्वीच काय ते राहीले होते.
ओफ्फिसेमधून येत असताना पार्ल्याला उतरून पृथ्वीकडे जायचे ठरले. आता या वयात सोबतीला
एखादी मुलगी असणे क्रमप्राप्त आहे, परंतु अजुन ते ही दिवस यायचे आहे . त्यामुळे सोबतीला
माझे (प. पु )आणि मुलापेक्षा , मित्रासारखे वागवणारे वडील सोबत होते. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता.






आता पृथ्वी आणि नाटक.









गेट मधून आत शिरल्या शिरल्याच एंट्रीच्या पायर्यांवर वर एक नाटक चालू होते,
हिंदी, इंग्लीश आणि मराठी या तिघी बहिणी असून, मराठी ही बहीण आपल्या हिंदी या बहिणीवर रागवलेली आहे.
कारण महाराष्ट्रात चाललेली मराठीची वाताहत आणि गळचेपी याला हिंदी ही कारणीभूत आहे असे तिला वाटते.
हा प्रयोग अगदी संपता संपता पहिल्याने इतके तरी लक्षात आले.
पृथ्वीचे एकंदर वातावरण हे कॉस्मोपॉलिटन असे होते. आणि ते तसे असणारच कारण मराठी सोडून
गुजराती, हिंदी या भाषेतील नाटक पण तिथे होतात. १९७८ साली बांधलेले हे थियेटर, मुंबई उपनगरच्या हृदयात असल्यासारखे आहे. (जुहु). भरपूर असे वेगवेगळे उपक्रम इथे चालतात.
हिंदी अभिनेते शशी कपूर हे या थियेटर चे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत.

पावटालॉजी ची तिकीटस घेऊन मी २ काप्पुचिनो कॉफी सांगितल्या, आणि सेल्फ सर्विस असल्याने, तयार झाल्यावर त्याचा आस्वाद मी आणि वडिलांनी  घेतला.


वेळ दिल्याप्रमाणे नाटक सुरू झाले.


आता नाटकाविषयी :-


तसा पावटा हा दुर्लक्शित असा पदार्थ. डाळिंबी उसळ हा प्रकार असतो.


पावटा याची उसळ कधी पहिली नाही. तर हे असे नकोसे झालेले पावटे .
नाटकाचा विषय हाच, सध्या समाजात एक असा तरुण वर्ग आहे, की ज्याला विवेक
नावाची गोष्ट माहीत नसते. तो नाक्यावर उभे राहणे, टिंगल टवाली करणे, यात आपला
खुपसा वेळ घालवतो.
तर असे हे निरुपयोगी आणि दुर्लक्षित पावटे. यांना गोळा करून यांची एक इन्स्टिट्यूट काढायची
आणि त्यांना पावटा गीरीचे फुल्ल ट्रेनिंग द्यायचे आणि नंतर त्यांची प्लेसमेंट गुंड, राजकीय नेते यांच्याकडे करायची. या बेसलाइन आधारित असे हे नाटक.
तर एकंदरीत राजकीय नेत्याला त्यातून कसे फायदे होतील याची जाणीव करून अशी इन्स्टिट्यूट काढायला तयार करणे, मग त्यावर चालणारी लेक्चर्स .


लेक्चर १ = या फील्ड मधे यायचे म्हणजे तुमचे कॉंटॅक्ट नेटवर्क चांगले असणे गरजेचे. ए.ग
फिल्म इंडस्ट्री , राजकीय पक्ष, एक्सेटरा एक्सेटरा.


लेक्चर २ = या लेक्चर मधे जमिनी बाळकावणे त्यावर अनधिकृत बांधकाम करणे. हे कसे जमवता येईल. यावर विशेष लक्ष दिले आहे.


लेक्चर ३ = हिंसा आणि तोडफ़ोड.
आपण ज्याला आपला गुरू ( आपला दादा, डॉन या अर्थी) मानतो त्याने सांगितल्या प्रमाणे , जास्त विचार न करता सांगितलेल्या जागएवर जाउन तेथील सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे, मारामारी कर सांगितली की जास्त विचार न करता करणे आणि इतके करून ही इंपॅक्ट जास्त होत नसेल तर माणसाना इजा करणे. ज्याने आपला दरारा वाढण्यास मदत होते. याचे मार्गदर्शन केले जाते.
आणि मग हा कोर्स पूर्ण झाला की यांची रवानगी योग्य त्या पक्षात,भाई,डॉन कडे करून देणे.
या विषयावर भाष्य करणारे असे हे प्रायोगिक नाटक. नाटक अगदीच असे ग्रेट नसले तरी छान होते.सगळ्या मुलानी छान असे काम केले आहे. मुलांची एनर्जी लेवेल पहिल्या पासून मस्त होती.
आलोक राजवाडे दिग्दर्शन करून नाटकात काम करत आहे.


खरच समाजात अश्या घटकांची संख्या जास्त झाली आहे का ?? , हा विचार मनात येत होता.
आणि विविध पक्ष त्यांचा असा वापर करत आहेत. यातून पटापट मिळणारे पैसे आणि त्यातून
करता येणारी चैन , यामुळे समाजातील असे घटक वाढत आहेत का ??  


थोड्या प्रमाणात का होईना डोक्याला शॉक दिला त्यांनी.

तर असा होता हा अनुभव ........


ता. क = आलोक राजवाडे याचे  गेली "एकवीस वर्षे" हे नवीन प्रायोगिक नाटक आले आहे.


समाप्त

Sunday, January 10, 2010

नटरंग (मराठी चित्रपट)

रं

कामाचा व्याप वाढल्याने , अक्खा वीक ब्लॉग वर नवीन पोस्ट करण्यास जमले नाही.



बहुचर्चित असा झेंडा बघायचा प्लान ठरला होता , परतु राजकीय सेन्सॉरशिप मधे अडकल्याने आणि नटरंग
त्याऐवजी लागल्याने , नटरंग पाहण्याच्या योग आला.

आता नटरंग या कलाकृती विषयी मला झालेले आकलन या विषयी खरडत आहे.

मध्यंतरी "रीटा" या शांता गोखले (अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्या आई) यांनी लिहिलेल्या पुस्तकावर
आधारित "रीटा" हा रेणुका शहाणे दिग्दर्शित चित्रपट येऊन गेला.

त्याच प्रमाणे "नटरंग" हा डॉ. आनंद यादव यांनी लिहिलेल्या नटरंग या पुस्तकावर आधारित आहे.

ऐनवेळी थोडा फार तिकिटचा गोंधळ झाल्याने " वाजले की बारा " ही लावणी अर्धिच पाहायला मिळाली.

नटरंग बघून कसे वाटले याचे उत्तर जरा का मला एक वाक्यात द्या असे सांगितले तर मी ईतकेच म्हणू

शकेन की नटरंग च्या प्रत्येक लावणिचे रंग जेवढे उत्कृष्ट, लोभसवाणे आणि सुखावह होते,तितकाच


नटरंग चा खरा रंग अतिशय गडद आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे .

पिंजरा १९७२ ( दिग्दर्शक:. वी. शांताराम ) या गाजलेल्या तमाशाप्रधान चित्रपटानंतर, नटरंग हा त्याच पठडितला चांगला चित्रपट इतक्या वर्षांनी पाहायला मिळाला.
पिंजरा , मी बघितला नसल्याने दोघांची तुलना मी करणार नाही.
(आणि तो पहिला असता तरी तुलना करणे मला शक्य नाही )

कारण प्रत्येक कलाकृती ही तिच्या जागी उत्कृष्ट असते, असे मी मानतो. त्यामुळे तुलना करण्याच्या भानगडीत मी पडत नाही. (आणि माझा तेवढा रीच पण नाही)असो...

अतुल कुलकर्णी हा नटरंगचा एक्का आहे. भूमिकेसाठी त्याने घेतलेली मेहनत त्याच्या कामातून दिसून येते.
अप्रतिम असे काम त्याने केले आहे. हॅट्स ऑफ.

नाच्या च्या भूमिकेला योग्य तो न्याय त्याने दिला आहे. आणि त्या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने त्याची निवड केली , यासाठी दिग्दर्शक (रवींद्र जाधव)यांचे आभार.


पोटापाण्यासाठी निवडलेला "तमाशा" हा मार्ग आणि त्यात आलेले यश-अपयश,तमाश्यामधे काम
करणार्‍या कलाकारांच्या जीवनाचे वास्तववादी दर्शन यावर भाष्य करणारा असा हा चित्रपट आहे.


अतुल च्या जोडीला , किशोर कदम (सौमित्र,गारवा फेम) यांचे ही काम छान झाले आहे .

सोनाली " अप्सरा आली" या लावणीत खरच अप्सरा सारखी दिसली आहे.



या लावणीच्या काही ओळी (मोह आवरत नाही).

ओ ओ ओ
कोमल काया की मोह माया
पूनव चांदणे न्हाले

सोन्यात सजले, रुप्यात भिजले
रत्नप्रभा तनु न्हालि

ही नटली थट्ली, जशी उमटली
चांदणी रंगमहाली

मी यौवनबिजली, पाहून थीजली
इन्द्रसभा भोवताली

अप्सरा आली ........

या सर्वांच्या जोडीला गुरू ठाकूर याने लिहिलेल्या लावण्या आणि तरुण संगीतकार अजय-अतुल
यांनी दिलेले संगीत , त्यामुळे लावण्या एकदम अस्सल वाटत आहेत.

खूप दिवसांनी वेगळ्या विषयावरचा आणि डोक्याला खाद्य पुरवणारा चांगला चित्रपट पाहायला मिळाला.

राजेंद्र

Sunday, January 3, 2010

संदीप-सलील ची गाणी

संदीप-सलील ची गाणी

या जोडगोळीची सगळीच गाणी आवडली नसली तरी , आवडण्याचा रेशो हळू हळू वाढत आहे.

गंधित वारे, दूर देशी गेला बाबा , दमलेल्या बाबांची कहाणी, त्या नंतर बेलाने गायलेली
रुण झूण वाजत पेंजण आणि जन्तर मंतर ,
या नंतर सध्या आवडलेले अजुन एक गाणे :- सखे कसे सांग तुला अगदीच नाही भय ???
अप्रतिम असे गाणे . Jantar Mantar Sung by Bela Shende.

पहिला प्रयत्न

नमस्कार मित्रांनो,
ब्लॉग लिहीण्याचा हा पहिलाच प्रयत्न , काय लिहायचे आणि कसे हा मोठा प्रश्न ???
स्वताबद्दल लिहीणे वाटते तितके सोपे नाही याची अनुभूती आली आहे.

काही जणांचे ब्लॉग वाचले ए.ग भूंगा, माझिया मना , त्यांच्या मी ५ % तरी लिहु शकलो तरी भरून पावले.

माझ्याबद्दल लिहायचे झाले तर , मुंबईत राहणारा, एक मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला मुलगा,
शिक्षण पूर्ण करून जॉब करत असणारा.
मित्रांमधे रमणारा, फिरायची आवड असलेला, जमेल तसे वाचनात रस घेणारा.

चांगल्या गोष्टीची आवड असलेला, ( हा वादाचा मुद्दा होऊ शकतो )
लोकाना काय चांगल्या प्रतीची दारू ही आवडू शकते. म्हणून ती काही चांगली गोष्ट होऊ शकत नाही.
पण ती सुद्धा मला आवडते .( आता ब्रँड विचारू नका) .पण सवय नाही ती.

आणि संगीताची आवड पण आहे, पण फक्त एकायला आवडते. गाणे म्हणणे,या जन्मात तरी शक्य नाही.
ही काळानुरूप लक्षात आलेली गोष्ट.

हिंदी मधे म्हणाल तर सोनू निगम, जावेद अली ........फरहानचा रॉक ऑन पण छान होता,
आणि माय मराठीत म्हणाल तर आशा भोसले, लता मंगेशकर,मिलिंद इंगळे, सलील कुलकर्णी,
बेला शेंडे, संदीप खरे, एट्सेटरा एट्सेटरा .

वर लिहिल्याप्रमाणे फिरायची आवड आहे, कॉलेज लाइफ मधे असताना दर सेमेस्टर ला एक या प्रमाणे
हरिश्‍चंद्र गड, रतन गड, राजगड, तोरणा, रायगड, हे किल्ले मित्रांच्या संगतीने पाहून झाले.

त्यामुळे ६ महिन्यात एकदा तरी , रोजच्या बिझी लाइफ मधून वेळ काढून कुठे तरी रीचार्ज होऊन यावे
यावर ठाम विश्वास आहे. स्वताच्या गावाला तरी जावेच, अगदीच दुसरीकडे कुठे जमत नसेल तर.

तर अश्या तर्हेने श्रीगणेशा झालेला आहे. बघू पुढे किती लिहिण्यास जमते.