Sunday, January 17, 2010

इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी @ Prithvi Theater, Juhu.

इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी @ Prithvi Theater, Juhu.




ऑफीस मधून घरी आल्यावर मस्त पैकी चिल मारत असताना वर्तमानपत्रातील मनोरंजन या पानावरून नजर भिरभिरत होती. जवळपास्स कुठे चांगला सिनेमा , नाटक आहे का
याची शोधा शोध चालू होती. असे चालू असताना नजर एका नाटकाच्या जाहिरातीवर गेली
"नाटक कंपनी , पुणे" सादर करीत आहे


थेसपो १० आणि थेसपो ११ चे विजेते दीर्घांक








Thespo is an annual youth Theatre Festival.


"इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी "
पृथ्वी थियेटर, जानकी कुटीर जुहु.
चला कधी प्रायोगिक पाहायचा योग येत नाही , आणि त्यात पृथ्वी थियेटर पण कधी पहिले नाही. तर या वेळी बघूच, दोन्ही गोष्टी कश्या आहेत ते.


नाटक पाहायची आवड असल्याने वेस्टर्न लाइन वरची दिनानाथ, शिवाजी मंदिर,
प्रबोधनकार ठाकरे .. अशी सगळी नाट्यगृह पाहून झाली. पृथ्वीच काय ते राहीले होते.
ओफ्फिसेमधून येत असताना पार्ल्याला उतरून पृथ्वीकडे जायचे ठरले. आता या वयात सोबतीला
एखादी मुलगी असणे क्रमप्राप्त आहे, परंतु अजुन ते ही दिवस यायचे आहे . त्यामुळे सोबतीला
माझे (प. पु )आणि मुलापेक्षा , मित्रासारखे वागवणारे वडील सोबत होते. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता.






आता पृथ्वी आणि नाटक.









गेट मधून आत शिरल्या शिरल्याच एंट्रीच्या पायर्यांवर वर एक नाटक चालू होते,
हिंदी, इंग्लीश आणि मराठी या तिघी बहिणी असून, मराठी ही बहीण आपल्या हिंदी या बहिणीवर रागवलेली आहे.
कारण महाराष्ट्रात चाललेली मराठीची वाताहत आणि गळचेपी याला हिंदी ही कारणीभूत आहे असे तिला वाटते.
हा प्रयोग अगदी संपता संपता पहिल्याने इतके तरी लक्षात आले.
पृथ्वीचे एकंदर वातावरण हे कॉस्मोपॉलिटन असे होते. आणि ते तसे असणारच कारण मराठी सोडून
गुजराती, हिंदी या भाषेतील नाटक पण तिथे होतात. १९७८ साली बांधलेले हे थियेटर, मुंबई उपनगरच्या हृदयात असल्यासारखे आहे. (जुहु). भरपूर असे वेगवेगळे उपक्रम इथे चालतात.
हिंदी अभिनेते शशी कपूर हे या थियेटर चे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत.

पावटालॉजी ची तिकीटस घेऊन मी २ काप्पुचिनो कॉफी सांगितल्या, आणि सेल्फ सर्विस असल्याने, तयार झाल्यावर त्याचा आस्वाद मी आणि वडिलांनी  घेतला.


वेळ दिल्याप्रमाणे नाटक सुरू झाले.


आता नाटकाविषयी :-


तसा पावटा हा दुर्लक्शित असा पदार्थ. डाळिंबी उसळ हा प्रकार असतो.


पावटा याची उसळ कधी पहिली नाही. तर हे असे नकोसे झालेले पावटे .
नाटकाचा विषय हाच, सध्या समाजात एक असा तरुण वर्ग आहे, की ज्याला विवेक
नावाची गोष्ट माहीत नसते. तो नाक्यावर उभे राहणे, टिंगल टवाली करणे, यात आपला
खुपसा वेळ घालवतो.
तर असे हे निरुपयोगी आणि दुर्लक्षित पावटे. यांना गोळा करून यांची एक इन्स्टिट्यूट काढायची
आणि त्यांना पावटा गीरीचे फुल्ल ट्रेनिंग द्यायचे आणि नंतर त्यांची प्लेसमेंट गुंड, राजकीय नेते यांच्याकडे करायची. या बेसलाइन आधारित असे हे नाटक.
तर एकंदरीत राजकीय नेत्याला त्यातून कसे फायदे होतील याची जाणीव करून अशी इन्स्टिट्यूट काढायला तयार करणे, मग त्यावर चालणारी लेक्चर्स .


लेक्चर १ = या फील्ड मधे यायचे म्हणजे तुमचे कॉंटॅक्ट नेटवर्क चांगले असणे गरजेचे. ए.ग
फिल्म इंडस्ट्री , राजकीय पक्ष, एक्सेटरा एक्सेटरा.


लेक्चर २ = या लेक्चर मधे जमिनी बाळकावणे त्यावर अनधिकृत बांधकाम करणे. हे कसे जमवता येईल. यावर विशेष लक्ष दिले आहे.


लेक्चर ३ = हिंसा आणि तोडफ़ोड.
आपण ज्याला आपला गुरू ( आपला दादा, डॉन या अर्थी) मानतो त्याने सांगितल्या प्रमाणे , जास्त विचार न करता सांगितलेल्या जागएवर जाउन तेथील सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे, मारामारी कर सांगितली की जास्त विचार न करता करणे आणि इतके करून ही इंपॅक्ट जास्त होत नसेल तर माणसाना इजा करणे. ज्याने आपला दरारा वाढण्यास मदत होते. याचे मार्गदर्शन केले जाते.
आणि मग हा कोर्स पूर्ण झाला की यांची रवानगी योग्य त्या पक्षात,भाई,डॉन कडे करून देणे.
या विषयावर भाष्य करणारे असे हे प्रायोगिक नाटक. नाटक अगदीच असे ग्रेट नसले तरी छान होते.सगळ्या मुलानी छान असे काम केले आहे. मुलांची एनर्जी लेवेल पहिल्या पासून मस्त होती.
आलोक राजवाडे दिग्दर्शन करून नाटकात काम करत आहे.


खरच समाजात अश्या घटकांची संख्या जास्त झाली आहे का ?? , हा विचार मनात येत होता.
आणि विविध पक्ष त्यांचा असा वापर करत आहेत. यातून पटापट मिळणारे पैसे आणि त्यातून
करता येणारी चैन , यामुळे समाजातील असे घटक वाढत आहेत का ??  


थोड्या प्रमाणात का होईना डोक्याला शॉक दिला त्यांनी.

तर असा होता हा अनुभव ........


ता. क = आलोक राजवाडे याचे  गेली "एकवीस वर्षे" हे नवीन प्रायोगिक नाटक आले आहे.


समाप्त

No comments:

Post a Comment