Sunday, January 3, 2010

पहिला प्रयत्न

नमस्कार मित्रांनो,
ब्लॉग लिहीण्याचा हा पहिलाच प्रयत्न , काय लिहायचे आणि कसे हा मोठा प्रश्न ???
स्वताबद्दल लिहीणे वाटते तितके सोपे नाही याची अनुभूती आली आहे.

काही जणांचे ब्लॉग वाचले ए.ग भूंगा, माझिया मना , त्यांच्या मी ५ % तरी लिहु शकलो तरी भरून पावले.

माझ्याबद्दल लिहायचे झाले तर , मुंबईत राहणारा, एक मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला मुलगा,
शिक्षण पूर्ण करून जॉब करत असणारा.
मित्रांमधे रमणारा, फिरायची आवड असलेला, जमेल तसे वाचनात रस घेणारा.

चांगल्या गोष्टीची आवड असलेला, ( हा वादाचा मुद्दा होऊ शकतो )
लोकाना काय चांगल्या प्रतीची दारू ही आवडू शकते. म्हणून ती काही चांगली गोष्ट होऊ शकत नाही.
पण ती सुद्धा मला आवडते .( आता ब्रँड विचारू नका) .पण सवय नाही ती.

आणि संगीताची आवड पण आहे, पण फक्त एकायला आवडते. गाणे म्हणणे,या जन्मात तरी शक्य नाही.
ही काळानुरूप लक्षात आलेली गोष्ट.

हिंदी मधे म्हणाल तर सोनू निगम, जावेद अली ........फरहानचा रॉक ऑन पण छान होता,
आणि माय मराठीत म्हणाल तर आशा भोसले, लता मंगेशकर,मिलिंद इंगळे, सलील कुलकर्णी,
बेला शेंडे, संदीप खरे, एट्सेटरा एट्सेटरा .

वर लिहिल्याप्रमाणे फिरायची आवड आहे, कॉलेज लाइफ मधे असताना दर सेमेस्टर ला एक या प्रमाणे
हरिश्‍चंद्र गड, रतन गड, राजगड, तोरणा, रायगड, हे किल्ले मित्रांच्या संगतीने पाहून झाले.

त्यामुळे ६ महिन्यात एकदा तरी , रोजच्या बिझी लाइफ मधून वेळ काढून कुठे तरी रीचार्ज होऊन यावे
यावर ठाम विश्वास आहे. स्वताच्या गावाला तरी जावेच, अगदीच दुसरीकडे कुठे जमत नसेल तर.

तर अश्या तर्हेने श्रीगणेशा झालेला आहे. बघू पुढे किती लिहिण्यास जमते.

3 comments:

  1. ब्लॉगच्या दुनियेत स्वागत..अरे नमन तर मस्तच झालंय..आणि तुला सांगु ते मोहाचे धुके हे नाव वेगळंच आणि छान आहे...माझ्या ब्लॉगचा उल्लेख केल्याबद्द्ल आभार नाही मानणार पण तुझ्या ब्लॉगची पहिली मैत्रीण व्हायचं ठरवलंय. पण तो मान तू स्वतःकडेच ठेवलाय..असो दुसरी तर दुसरी...आता नेहमी लिहित जा...वाचायला नक्की आवडेल.
    एकच प्रश्न ते तुझ्या प्रोफ़ाइलमधलं पॅपिलॉन भगुभईच्या बाहेरचं का??

    ReplyDelete
  2. chan lihilas tu raju asach kahi je sahaj tujhya baddal suchel te nakki lihi mala vachayala nakki avadel all the best

    ReplyDelete
  3. राजु अता कुठे तुज़ा ब्लोग वाचुन ज़ाहला... म्स्त लिहिला आहेस रे ब्लोग....विशेस म्हन्जे तुज़ा पहिल्या पोस्त पासुन अत्ता पर्यन्त च्या सग्ल्या पोस्त मस्त आहेत.... तु खरच ब्लोग खुप चाग्ला लिहिला आहे....असच लिहित्त जाशिल ही अपेक्शा.....
    बेस्त ओफ़्फ़ ल्क....आणी ब्लोग च्या ह्या विश्वात तुज़ा स्वागत.....


    Sarang Pethe....

    ReplyDelete